प्रतिनिधी/ बेळगाव
सहा महिन्यांपूर्वी शहापूर येथे झालेल्या जीव घेण्या हल्ल्या प्रकरणी शहापूर पोलिसांनी शुक्रवारी विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 21, मुळचा रा. चिक्कनंदिहळ्ळी, ता. बैलहोंगल, सध्या रा. शास्त्राrनगर) याला अटक केली आहे. पोलीस कोठडीत घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
1 जानेवारी रात्री शहापूर येथे अभिजित भातकांडे (वय 39) या युवकावर खुनी हल्ला झाला होता. या प्रकरणी विशालला अटक झाली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. शुक्रवारी दुपारी न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला पोलीस कोठडीत घेण्यात आले. अटकेची प्रक्रिया पूर्ण करुन पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
20 जून रोजी खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी विशालसिंग व प्रथमेश नारायण गणिकोप्प (वय 19, रा. शास्त्राrनगर) या दोघा जणांना अटक केली होती. विशाल हा सहा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनी हल्ल्या प्रकरणातील फरारी संशयित होता. त्यामुळे न्यायालयाची परवानगी घेवून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी रवीकुमार कोकीतकर (वय 45), राजू मोरे (वय 35) या दोघा जणांना पूर्वीच अटक झाली आहे. पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला कोयता व एक कार जप्त करण्यात आली आहे. यासंबंधी भा.दं.वि. 341, 307, 504, 506 सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.








