राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी कोल्हापूर रोडवर खिंडी व्हरवडे ते आणाजे दरम्यान कोल्हापूरकडे भरधाव वेगात जाणारी टाटा इंडिका कारचा अपघात झाला. यात चालक एकनाथ गुंडू पाटील वय ५६ यांचा मृत्यू झाला. पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने कारवरचा ताबा सुटून कार विरुद्ध दिशेला झाडाला धडकली यात ते जागीच ठार झाले. तर गाडीमधील दोन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी आहेत. स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील राजाराम पोवार, महेश खांडेकर यांनी १०८ अम्ब्युलेन्सला सम्पर्क करून जखमींना उपचारासाठी कोल्हापूर इथल्या खाजगी रुग्णालयात पाठवले.
अपघातग्रस्त गाडीचा एम एच ०९ बी बी ३००७ असा नंबर आहे. मृत एकनाथ पाटील हे कोल्हापूर इथल्या उद्योग भवनला औद्योगिक विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांचे मूळ गाव गडहिंग्लज तालुक्यातील बटकलंगले हे आहे. अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे हवालदार बजरंग पाटील करत आहेत.









