वार्ताहर / कास :
भाजपचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी शिवसेना नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण डोंबिवलीचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची दरे येथे सदिच्छा भेट घेतली.
त्यानंतर दरे तांब येथून परतत असताना खा. उदयनराजे शिवसागर जलाशयात गाढवली ते तापोळापर्यंत वाहनांची वाहतूक करणाऱ्या तरंगत्या तराफ्याचे सारथी बनले.










