सातारा / प्रतिनिधी :
खासदार उदयनराजे यांची स्टाईल, यांचे डायलॉग अन् त्यांची अदा सगळ्यांना ज्ञात आहे. कोणी त्यांना प्रेमाने बच्चन म्हणतं तर कोणी मालक म्हणतं. उदयनराजे यांनी काल पोवई नाक्यावर आंब्याच्या झाडाखाली ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भीक मागो आंदोलन करत लॉकडाऊनला विरोध केला. आज त्यांनी जावलीत एका कार्यकर्त्याकडे जाऊन बॉक्सिंगच्या किटवर लॉकडाऊनचा चांगला राग काढला. तसेच त्यांनी 14 किलोचा करेल उचलून व्यायाम करण्याचा संदेश दिला.









