प्रतिनिधी /बेळगाव
खासबाग सर्कल येथील सीडीवर्कचा काही भाग कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. मुख्य रस्त्याशेजारीच सीडीवर्क कोसळल्याने धोकादायक स्थितीत आहे. रात्रीच्यावेळी निदर्शनास न आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता असल्याने लवकर दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.
शहरातील अनेक सीडीवर्क आता कमकुवत झाले आहेत. त्यामुळे ते केव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. खासबाग येथील संत बसवेश्वर सर्कल येथून भारतनगरकडे जाणाऱया रस्त्यावरील सीडीवर्क कोसळले आहे. ये-जा करणाऱया वाहनचालक व पादचाऱयांना या ठिकाणाहून सांभाळून जावे लागत आहे. दर रविवारी या ठिकाणी बाजार भरत असल्याने सीडीवर्कची लवकर दुरुस्ती करण्याची मागणी रहिवाशांमधून करण्यात येत आहे.









