प्रतिनिधी / कोल्हापूर
खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या कार्यालयाला अचानक भेटी दिली. उभयतामध्ये महापालिका निवडणुकीविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाजी पेठेतील एका निकटवर्तीय व्यक्तीच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने त्या परिवाराचे सात्वंन करण्यासाठी खासदार मंडलिक आले होते.
त्यानंतर त्यांनी शहर शिवसेना कार्यालयात जावून शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये आगामी काळात होणाऱया महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. प्रभाग निहाय असणारी राजकीय स्थिती, इतर पक्षांची तयारी, शिवसेनेची तयारी, शहरात सध्या असणारे वातावरण आणि शिवसेनेने कोणत्या प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर वाटचाल करणे आवश्यक आहे, आदी बाबींवर या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
यावेळी उमेश पाटील, युवा सेनेचे शहर प्रमुख पियुष चव्हाण, शिवसेना विभाग प्रमुख कपिल सरनाईक, राकेश माने, सौरभ तावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिका निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत आहे. विविध राजकीय पक्ष तयारी करत आहेत. राजकीय हालचालींवर नजर ठेवली जात आहे. अशा वातावपाटीलरणात खासदार मंडलिक आणि रविकिरण इंगवले यांच्या भेटीची चर्चा शहरात चांगलीच रंगली.