ऑनलाईन टीम / प्रयागराज :
उत्तरप्रदेशातील प्रयागराज मतदार संघातील भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या 6 वर्षाच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फटाके फोडताना त्यांची नात गंभीररित्या जखमी झाली होती. तिचा मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार रीता जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके फोडत होती. फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला आणि यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. त्यामुळे लगेचच तिला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की या अपघातात तिचे शरीर 60% भाजले आहे. त्यामुळे उपचारासाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र दिल्लीत उपचारादरम्यान या चिमुकलीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रीता जोशी, त्यांची सून आणि नातीला देखील कोरोनाची लागण झाली होती.









