कणकवली:
शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघातील सरपंचांना पीपीई किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा वाटप कार्यक्रम येथील विजयभवन येथे आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या उपस्थितीत झाला. जिल्हाप्रमुख संजय पडते, जि. प.चे गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, कणकवली तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवासेना माजी जिल्हाप्रमुख ऍड. हर्षद गावडे, सरपंच बापू नर, प्रमोद कावले, सुदाम तेली, आप्पा तावडे, देवेंद्र सावंत, नारायण आर्डेकर, दीपक सावंत, सुप्रिया रांबाडे, विदिशा तेली आदी उपस्थित होते.









