प्रतिनिधी/ म्हापसा
राज्यातील बहुतेक खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधीत रुग्णांची आर्थिक फसवणुक होत असून या गोष्टीची दखल घेत सरकारने अशा हॉस्पिटल्सवर कारवाई करतांनाच ही हॉस्पिटल्स आपल्या ताब्यात घेण्याची मागणी उत्तर गोवा जिल्हा कॉग्रेस समीतीचे अध्यक्ष विजय भिके तसेच समितीकडून करण्यात आले आहे. म्हापसा येथील पक्ष कार्यालयात रविवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे ही मागणी करण्यात आली.
हल्लीच्या काळात कांही खाजगी इस्पितळ व्यवस्थापनाकडून कोरोना बाधीतांची सामान्य चाचणी करण्यासाठी अनेकांकडून एक लाखापासून ते चार लाखापर्यतची रक्कम बिलापोटी उकळण्यात आल्याची माहिती यावेळी भिके यांनी दिली. दरम्यान, खाजगी इस्पितळात रुग्ण दाखल होतांच त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात आगाऊ रक्कम एडवान्सच्या रुपाने ठेवून घेतली जाते नंतर या ना त्या कारणांनी सदरची रक्कम लाटण्याचे प्रकार खुलेआम होत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, सरकारी इस्पितळात चांगल्या आरोग्य सेवा तसेच स्वच्छतेचा अभाव असल्यामुळेच स्थानिक लोकांना खाजगी इस्पितळांकडे वळावे लागते मात्र याच गोष्टीचा फायदा उठवीत खाजगी इस्पितळ व्यावस्थापनाकडून अशा प्रकारची लुट करण्यात येत असल्याचे भिके यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारी इस्पितळात साधनांची उणीव असल्याने अनेक कोरोना बाधितांवर खाली जमीनीवर झोपण्याची वेळ आली होती या गोष्टीचे त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीं?ना आठवण करून दिली. दरम्यान, कॉग्रेस पक्ष ऐतिहासिक ठेव असलेला पक्ष असल्याने दिवसेंदिवस गोमंतकीय जनता पक्षाकडे आप्रु÷ होत आहे , अनेकांनी पक्षात येण्याचे सत्र सुरु केले आहे मात्र भाजप पक्ष यावेळी स्वताच्या कर्मानीच संपणार असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. दरम्यान, म्हापसा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा एससी आणी एसटी समाजाचे नेत्रुत्व सांभाळणार्या एन्थ?नियो आल्वारिस यांनी आपल्या समर्थकांसहित रविवारी सकाळी कॉग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे सरचिटणीस भोलानाथ घाडी , म्हापसा गटाध्यक्ष मिताली गडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते









