बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाहत आहे. बऱ्याच ठिकाणी बेड मिळत नसल्याने रुग्णांना ताटकळत थांबावे लागत आहे. अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. राज्याचे मुख्य सचिव पी. रवि कुमार यांनी खाजगी रुग्णालयांना बेडचा तपशील दाखविण्यासंबंधी आणि मदत डेस्क तयार करण्याचे आदेश दिले असून, तसे न केल्यास त्यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात शनिवारी एक अधिसूचना जारी केली आहे.
सचिव कुमार म्हणाले, “काही रुग्णांना बीबीएमपीच्या केंद्रीय वाटप यंत्रणेने वाटप करूनही त्यांना दाखल करून घराण्यास असमर्थता दर्शविली आहे.” “म्हणूनच कर्नाटक खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान (केपीएमई) अधिनियमांतर्गत नोंदणीकृत सर्व रुग्णालयांनी रिसेप्शन काउंटरवर बेड वाटप संदर्भात तपशील प्रदर्शित करणे अनिवार्य आहे.”
प्रदर्शनात रुग्णालयाचे नाव, एकूण बेड्यांची संख्या आणि बीबीएमपीने संदर्भित कोविड -१९ रूग्णांसाठी वाटप केलेल्या बेडची संख्या असावी. कुमार यांनी नमूद केले की, “बेड्चे वाटप बीबीएमपीच्या केंद्रीय बेड वाटप प्रणालीच्या आकडेवारीनुसार करणे आवश्यक आहे.” असे ते म्हणाले.