बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील एका खासगी नर्सिंग कॉलेजच्या ४० विद्यार्थ्यांना कोविड -१९ पॉझिटिव्ह आढळले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ५ मुले आणि ३५ मुली नर्सिंग विद्यार्थ्यांना कोविड -१९ ची लागण झाली आहे. बीबीएमपीने यासाठी वैद्यकीय पथक तैनात केले असून या भागाची स्वच्छतादेखील केली. काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आणि बाकीच्यांना अलग ठेवण्यात आले आहे.









