वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा खासगी रुग्णालयांना इशारा
सोलापूर / प्रतिनिधी
आपल्याला खासगी रुग्णालयात सोबत समन्वय साधून काम करावे लागणार आहे. काही ठिकाणी प्रोटॉकल असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे मात्र त्यावर मार्ग काढत पुढे जाण्याची सरकारची भूमिका आहे. तरीसुद्धा खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णाबाबत हलगर्जीपणा आणि दिरंगाई झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिला. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आज रविवारी सोलापूर जिल्हा दौर्यावर आले होते. जिल्हा प्रशासना बरोबर कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सोलापूर शहरात विडी कामगार व झोपडपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी वेगळ्या तर्हेने काही उपाययोजना करता येतील काय त्या अनुषंगाने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांनी हा विषय माझ्या कानावर घातल्याचे देशमुख यांनी सांगितले महात्मा फुले योजना अंतर्गत राज्यातील जनतेचा विमा उतरविला आहे, त्यामुळे त्याचाही फायदा होईल.
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे हे चिंताजनक बाब आहे. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी सोलापुरात कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या प्रशासनाला सहाय्यक करण्यासाठी खास टीम पाठविण्याच्या सूचना मला काही जणांनी केले आहेत त्यावर विचार करून त्याची टीम पाठविण्याचा प्रयत्न करू असेही देशमुख यांनी सांगितले. खाजगी रुग्णालयात एखाद्या रुग्णाला दाखल केल्यास त्याची हेळसांड होणार नाही याची काळजी घेतली जाईल त्याच ठिकाणी गैरसोय होणार नाही त्याचबरोबर त्याला आर्थिक तेवढे येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या रुग्णाला प्रशांत शासनाने खाजगी रुग्णालयात दाखल केले तर त्याचा खर्चही प्रशासनच करेल असेही देशमुख यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मनपा आयुक्त पी शिवशंकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले आदी उपस्थित होते.
पुढील आठवड्यात शंभराव्या लॅबचे लोकार्पण
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी चांगले काम करत आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाबाबत योग्य ते निर्णय घेतले आहेत. कोरणा च्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात शंभराव्या लॅबचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
विद्यार्थी जिथे असेल तिथे परीक्षा
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वैद्यकीय परीक्षा या विद्यार्थी ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी थोडासा वेळ देण्याच्या सूचनाही विद्यापीठाने दिल्या असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे पालकांनी काळजी करण्यासारखे काही नाही. वैद्यकीय महाविद्यालयांच्या परीक्षा होणार.
अजून काय म्हणाले देशमुख
समूह संक्रमणमध्ये आपण आलो नाही, ही समाधानाची बाब आहे, सरकार उपाय योजना करीत आहे
सोलापुरातील शासकीय व खाजगी रुग्णालयात खाटा वाढवणार
- आपत्तीमध्ये राजकीय भाष्य करणे उचित नाही, केंद्र आणि राज्य मिळून कर्तव्य बजवायचं
- सोलापूर शहरात कडक उपाययोजना कराव्या लागतील
- महात्मा फुले आरोग्य योजनेतून राज्याच्या जनतेला
विमा उतरविण्याचा निर्णय घेतला
- देशामध्ये सर्वाधिक टेस्टिंग महाराष्ट्रात झाल्या
– खाजगी रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होऊ देणार नाही
योग्य ती खबरदारी घेऊ
- महाराष्ट्रात प्लाजमा थेरपीला परवानगी दिली, ननातेवाईकांची परवानगी घेऊन राज्यातील अडीचशे रुग्णांवर त्याची ट्रायल घेतली जाणार आहे
- विडी कामगारांसाठी वेगळ्या तर्हेने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या
- लॉकडाऊनचा परिणाम झाला नाही तर आकडा वाढला असता.









