मंत्री वडेट्टीवार यांचे क्लास चालकांच्या शिष्ठमंडळाला आश्वासन
प्रतिनिधी/मिरज
खासगी कोचिंग क्लासेस चार जानेवारीपासून सुरु होतील, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र या कोचिंग क्लासेस संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती प्रा. रविंद्र फडके यांनी दिली. खासगी क्लास चालक संघटनेचे अध्यक्ष विजय पवार, माजी राज्याध्यक्ष सुभाष देसाई, संस्थापक राज्यअध्यक्ष प्रवीण ठाकूर, ज्येष्ठ सदस्य प्रशांत कासार, अर्जुन भोसले, रणजीत डीसले, निखिल तावरे आणि अतुल निनगुरे या शिष्टमंडळाने मंत्री वडट्टीवार यांची भेट घेऊन खासगी क्लास सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली. क्लास चालकांच्या मागणीला मंत्री वडेट्टीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
Previous Articleवैराग येथे ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा निर्णय
Next Article ‘जयहिंद’च्या सचिव, लिपिकाला तालुका उपनिबंधकांचा दणका








