वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाचा प्रभाव असतानाही 2020 मध्ये प्रायव्हेट इक्विटीच्या (पीइ) आधारे देशामध्ये जवळपास 2.47 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एक वर्षाच्या आगोदर समान कालावधीच्या तुलनेत ही गुंतवणूक 108 टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये 1.31 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही रिलायन्स समूहाच्या जिओ आणि जिओ रिटेलकडून प्राप्त झाली आहे.
2019 मध्ये एकूण 665 व्यवहाराच्या आधारे 16.2 अब्ज डॉलर्सची खासगी इक्विटी गुंतवणूक मिळाली होती. 2020 मध्ये व्यवहार संख्या वाढून 791 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 33.8 अब्ज डॉलर्सची खासगी इक्विटी गुंतवणूक मिळाली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
इंटरनेटच्या मदतीने कंपन्यांना मिळाली जादाची गुंतवणूक
2020 मध्ये इंटरनेटवर आधारीत कंपन्यांनी सर्वाधिक खासगी गुंतवणूक इक्विटी इन्वेस्टमेंटकडे आकर्षित केली आहे. याचदरम्यान या कंपन्यांना 7.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळाली आहे. 2019 मध्ये 5.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळाली होती.
काही क्षेत्रातील गुंतवणूक घटली
आर्थिक सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्ट आणि कॉम्प्युटर हार्डवेअरशी संबंधीत असणाऱया कंपन्यांमधील मिळणारी खासगी गुंतवणूक कमी आली आहे. उपलब्ध माहितीनुसार फायनान्शिअल सर्व्हिसेसला 1.4 अब्ज डॉलर, ट्रान्सपोर्टेशन क्षेत्रास 127 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली आहे.









