ऑनलाईन टीम / किव्ह :
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज चौथा दिवस असून, या युद्धाची धग आता तीव्र होत आहे. युक्रेनची राजधानी किव्हमध्ये मोठय़ा प्रमाणावर हल्ले केल्यानंतर रशियन सैन्याने आता युक्रेनचं दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या खार्किवमध्ये प्रवेश केला आहे. सध्या तिथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष सुरु असल्याची माहिती विभागीय प्रशासनाने दिली असल्याचं वृत्त एएफपी न्यूजने दिलं आहे.
दरम्यान, युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने सांगितले की, रशियाच्या सैनिकांनी खार्किव येथे गॅस पाईपलाईन बॉम्बने उडवली आहे. स्पेशल कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन प्रोटेक्शनच्या राज्य सेवेने चेतावणी दिली की स्फोटामुळे पर्यावरणीय आपत्ती उद्भवू शकते आणि रहिवाशांना त्यांच्या खिडक्या ओल्या कपडय़ांनी झाकून टाका आणि भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ पिण्याचा सल्ला दिला आहे. खार्किव हे शहर रशियन सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर असून, त्याची लोकसंख्या 1.5 दशलक्ष आहे.