काही काळ महामार्गावरील वहातूक ठप्प
खारेपाटण / वार्ताहर
कोकण पट्यात दोन दिवस सतत कोसळणार्या पावसामुळे नवीन केलेल्या महामार्गाच्या कामाची सुरुवतीलाच पडझड चालू झाली असुन.खारेपाटण नजिक नडगीवे येथील आदीष्टी मंदीराजवळ घाटीमधील दरड रात्रो 11.00 च्या दरम्यान कोसळली. यामुळे मातीचा मोठा ढिगारा महामार्गावर आल्याने काही काळ महामार्गावरील वहातूक ठप्प झाली होती. सदर ठिकाणी खारेपाटण आऊट पोस्टचे अंमलदार पो.ना.साबळे, पो.ना.पोकळे, होमगार्ड मरिये यानी तात्काळ भेट देऊन सदर ठिकाणची परिस्थिती पहाणी केली आणि मुख्य कार्यालयातील पोलिसांना संपर्क करून त्यांनी एकमार्गी रस्ता वहातूक सुरू केली.
तसेच हायवे रोड ठेकेदार के.सी.सी कंपनी चे मॅनेजर राम परवेश यादव यांना माहिती देऊन त्यांना कर्मचर्यांसह घटनास्थळी बोलवण्यात आले. त्यांचे कडील जेसीबी च्या साहाय्याने माती दगड बाजूला करण्याचे काम केले. दरडीचे वरील बाजूस विज वितरणाचे 33 kv चे खांब आहेत, त्याबाबत महवितरण चे वैभववाडी सब स्टेशन येथील ऑपरेटर सुप्रिया पवार यांना माहिती दिली असता त्यांनी खारेपाटण कार्यालयात संपर्क साधून तेथील कर्मचारी ओमकार नागावकर, अनिकेत जाधव यांना घटनास्थळी पाठवले अणि सर्वांच्या सहकार्यांने काही वेळाने वाहतूक सुरळीत चालू केली ,घटनास्थळी सपोनि खंडागळे, श्री.सावंत व पोलिस कर्मचारी हजर होते.









