वार्ताहर / कणकुंबी
खानापूर तालुक्मयातील माध्यमिक शाळांतील गणित विषयाच्या शिक्षकांची कार्यशाळा खानापूर येथील मराठा मंडळाच्या ताराराणी विद्यालयात झाली. कार्यशाळेचे उद्घाटन तालुका गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले. उद्घाटन अध्यक्षस्थानी ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. बी. देसाई होते.
रिसोर्स पर्सन म्हणून शिरोली हायस्कूलचे श्रीपाद कुलकर्णी यांनी मराठी माध्यमाच्या शिक्षकांना गणित विषयाबद्दल मार्गदर्शन केले. कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना जॉन बेंजामिन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी मार्गदर्शन करताना म्हणाले, दहावीच्या निकालामध्ये गणित विषय हा महत्त्वाचा विषय असून तालुक्मयाचा दहावीचा निकाल वाढविण्यासाठी सर्व गणित विषय शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक शाळेत शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची विभागणी करून विशेष लक्ष देण्याची सूचना केली. मराठी माध्यमाच्या गणित विषयाचे नोडल अधिकारी म्हणून अनिल कदम तर कन्नड माध्यमाच्या गणित विषयाचे नोडल अधिकारी म्हणून ललिता चेन्नयगोळ तसेच कार्यशाळेचे अध्यक्ष व्ही. बी. होसूर व पी. एस. हुलमनी यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्ष समारोप करताना व्ही .बी. देसाई यांनी दहावीचा निकाल वाढीसाठी सर्व शिक्षकांनी प्रामाणिकपणे कार्यरत राहून गट शिक्षणाधिकारी यांच्या अपेक्षेप्रमाणे दहावीचा रिझल्ट देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी तालुक्मयातील मराठी, कन्नड माध्यमिक शाळांचे गणित विषयाचे शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन बोमन्नवर यांनी केले प्रसाद काशीद यांनी आभार मानले.









