खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने माजी कृषिमंत्री शरद पवार यांची बेळगाव येथे भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन दिले.
या निवेदनात सीमाप्रश्नासाठी गेल्या 66 वर्षांत लोकशाहीमार्गाने अनेक आंदोलने करण्यात आली. हुतात्मे झाले मात्र सीमाप्रश्न सुटलेला नाही. हा प्रश्न 2004 साली महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. मात्र सुप्रीम कोर्टात जराही पुढे सरकलेला नाही. यासाठी शरद पवार यांच्या 93 च्या तोडग्याचा पुनर्विचार व्हावा, असे निवेदनात म्हटलेले आहे. तसेच शरद पवार यांनी केंद्रीय स्तरावर चर्चा करून तडजोडीने हा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी खानापूर तालुक्मयाचे माजी आमदार दिगंबर पाटील, पहिले सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण, नारायण लाड, शंकर पाटील, बाबुराव पाटील, समिती कार्यकर्ते प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, विवेक गिरी, बाबासाहेब दळवी, नारायण कापोलकर, मऱयाप्पा पाटील, कृष्णा मन्नोळकर, बाळाराम शेलार यासह समितीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









