तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 133 वर : गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्यात मंगळवारी आणखी दहा जणांना पॉझिटिव्ह झाल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे यामध्ये गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ही कोरोनाची लागण झाली आहे त्याप्रमाणे खानापूर शहर , उपनगरातही तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आज जाहीर झालेल्या दहा पॉझिटिव्ह मध्ये खानापूर क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी 49 वर्षीय पुरुष, हिंदू नगर खानापूर येथील 15 वर्षीय युवती, कुट्टीनोनगर खानापूर येथील 45 वर्षीय पुरुष, मिशन कंपाउंड खानापूर 45 वर्षीय महिला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागांमध्ये इटगी येथे 60 वर्षीय पुरुष, बिडी येथे 27, 23 वर्षीय दोन महिला, गंदीगवाड येथे 40 वर्षीय पुरुष, लालवाडी क्रॉस 23 वर्षीय महिला व बामणवाडी येथे 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे त्यामुळे तालुक्यातील पॉझिटिव किती संख्या 133 वर पोहोचली आहे. तालुक्यात आतापर्यंत त्यामुळे चार पुरुष व एक महिलेचा मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक जण कोरोना मुक्त झाले आहेत.