खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात गुरुवारी कोरोनाबाधितांच्या संख्येला अल्पसा बेक लागला असून या दिवशी तीन कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यापैकी दोघे नंदगड येथील बंजत्री गल्लीत तर एक कोरोनाबाधित लोंढय़ातील जनता कॉलनीत सापडला आहे. यामुळे आता तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 237 इतकी झाली आहे.









