तालुक्यात दोन वर्षाच्या बालकाला कोरोनाचा संसर्ग
खानापूर/ वार्ताहर
खानापूर तालुक्यात गुरुवारी आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 71 वर पोहोचला आहे. गुरुवारी आलेल्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खानापूर तालुक्यातील एका दोन वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . सदर बालकाचा अहवाल रामगुरवाडी पत्त्यावरून आला असला तरी त्या बालकाच्या आईचे गाव कौंद्ल असल्याचे समजते. तसेच गांधीनगर खानापूर येथील 60, 50, 45 वर्षीय तीन महिलांचा समावेश आहे . तर खानापूर शहरात एक व लालवाडी येथील डॉक्टर 57 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. सदर व्यक्ती पेशाने डॉक्टर असून तो सध्या बेळगाव केएलई येथे एक्स-रे विभागात सेवेत कार्यरत आहे पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांच्या घर परिसरात सील करण्यात आले आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील बाधितांची संख्या आता 71 वर पोहोचले आहे.लालवाडी येथे सापडलेल्या रुग्णाच्या घर परिसरात सील करून निर्जंतुकीकरण करण्यात आली आहे.