एकाचवेळी सुगीची कामे सुरू झाल्याने मजुरांची कमतरता : भातकापणी, मळणी, ऊसतोड कामांची धांदल : विद्यार्थीवर्गही गुंतला कामात
आप्पाजी पाटील / नंदगड
पाऊस येण्याची शाश्वती कमी झाली असून वारा मात्र बऱयापैकी सुटला आहे. त्यामुळे तालुक्मयातील अनेक शेतकरी भातकापणी, बांधणी व मळणीच्या कामात व्यस्त आहेत. एकाचवेळी सुगीची कामे जोरात सुरू असल्याने मजुरांची कमतरता भासत आहे.
खानापूर तालुक्मयात पावसाळय़ातील चार-पाच महिने बऱयापैकी पाऊस होतो. त्यामुळे येथील शेतकरी भाताचे पीक घेतात. भात हे येथील प्रमुख पीक आहे. खानापूर तालुक्मयातील कापोली, हलगा, हलशी, बिडी, नंदगड, लोंढा, गुंजी, नेरसा, शिरोली, रामगुरवाडी, बरगांव, लालवाडी चापगाव, गर्लगुंजी, लोंढा, जांबोटी, कणकुंबी तसेच हेम्माडगा येथे भाताचे पीक घेण्यात येते. मध्यंतरीचे काही दिवस पावसाने ओढ दिली होती. परंतु त्यानंतर पिकाला जेवढा आवश्यक पाऊस हवा होता तेवढा पाऊस झाला. परिणामी पिकाची जोमाने वाढ झाली. त्यामुळे भातपीक बऱयापैकी आले
होते.
यावषी शेतकऱयांनी मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात भाताची पेरणी केली होती. माळावरील जमिनीत तीन महिन्यात येणारे भातपीक पेरले होते. ते भातपीक सप्टेंबर महिन्यातच कापणीला आले होते. परंतु ऑक्टोबर संपूर्ण महिना पाऊस पडण्यातच गेला. त्यामुळे शेतकऱयाला भाताची कापणी करणे अडचणीचे झाले. कित्येक दिवस भात जमिनीतच राहिल्याने ते जमिनीला टेकले होते. परिणामी बऱयाच प्रमाणात भाताचे दाणे जमिनीवर पडून नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी भाताला पुन्हा पालवी फुटली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी शेतकऱयांना नुकसान व त्रासाची बाजू निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात रोज सायंकाळी थोडाफार पाऊस पडत होता. परंतु पावसात कापलेले भातपीक भिजले तरी चालेल, पण तसेच शेतात ठेवून नुकसान करण्यात काय अर्थ आहे, असे विचार शेतकरी वर्गात निर्माण झाल्याने पावसाची तमा न बाळगता शेतकरीवर्ग भातकापणी, बांधणीच्या कामात गुंतला होता. त्यावेळी बांधलेल्या भाताची सध्या मळणी केली जात आहे. तर पाणथळ जमिनीतील भातपिकाची सध्या कापणी, बांधणी व थेट मळणीही केली जात आहे.
खर्च देऊन मजुरांची ने-आण
सर्व भागातील व गावातील सर्वांची भात कापणी एकाचवेळी आल्याने मजूर मिळणेही कठीण झाले आहे. आपल्या घरात जेवढी माणसं असतील तेवढय़ांना शेतात नेऊन भातकापणी केली जात आहे. मजुरांची कमतरता भासत असल्याने मजुरीतही वाढ झाली आहे. ज्या गावात भातपीक कमी प्रमाणात घेण्यात येते. अशा गावातील मजुरांना टेम्पो, ट्रक्सद्वारे आणून त्यांच्या जाण्या-येण्याचा खर्च देऊन भातकापणी करून घेण्याचाही प्रकार सुरू आहे.
ऊस तोडणीचा हंगाम सुरूच
खानापूर तालुक्मयातील उसाला चांगला उतारा असल्याने कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने खानापूर तालुक्मयातील ऊस नेण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. गेल्या महिन्याभरापासून खानापूर तालुक्मयाच्या विविध गावातून ऊस तोडणी सुरू आहे. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या शेतवडीतील ऊस तोडण्याचे काम सुरू आहे.
शालेय विद्यार्थी शेतीकामात व्यस्त
कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वत्र शाळा कॉलेजीस बंद आहेत. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी वर्ग आता शेतीकामात आपल्या आई-वडिलांसोबत गुंतला आहे. पालकांनाही त्यांच्या मुलांची बऱयाच प्रमाणात साथ मिळत असल्याने शेतीकामात थोडीफार मदत झाली आहे.
हंगाम…!
उशिरा भातकापणीमुळे भातपीक टेकले जमिनीला
भातकापणी, बांधणीबरोबरच आता मळणीलाही प्राधान्य
पावसात कापून ठेवलेल्या भाताची मळणीही सुरू
मळणीत जनावरांची पात
इतिहासजमा, ट्रक्टरचा उपयोग









