बुधवारी तालुक्यात 8 पॉझिटिव्हची भर खानापूर /वार्ताहर- खानापूर तालुक्यात कोरूना पॉझिटिवचा आकडा दिवसेंदिवस वाढतच जात आहे बुधवारी आणखी आठ जणांना कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल समोर आला आहे त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधिताची एकूण संख्या 141 वर पोहोचली आहे बुधवारी आलेल्या आठ पॉझिटिव्ह मध्ये खानापूर व परिसरात पाच जणांना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. तर ग्रामीण भागांमध्ये तीन जणांना बाधा झाली आहे यामध्ये खानापूर शहरात अनुक्रमे 49, 36 वर्षीय पुरुष व एका 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे विद्या नगर मध्ये दोन व दुर्गानगर मध्ये एकाचा समावेश आहे तर पोलीस कॉटर्स मध्ये एक 29 वर्षीय पुरुष, अग्निशामक दल ऑफिस मध्ये एक 56 वर्षीय महिला, हलकर्णी येथे 29 वर्षीय पुरुषचा समावेश आहे. तर इठगी 52, 46 वर्षीय अशा दोन महिलांचा समावेश आहे त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधित यांची संख्या 141 वर पोहोचली आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









