प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यात सकाळपासून मूसळधार पाऊस सुरू असलेने त्या पाऊस व वादळी वा-याने झालेल्या नुकसानीचा अहवाल प्राथमिक स्वरूपात घेण्यात आला आहे. तालुक्यातील अकरा रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
लेंगरे ते ढोराळीवाडी, जखिणवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्ता खचल्याने वाहतुकीस धोकादायक आहे. येरळा नदीला पूर आल्याने कमळापूर ते रामापूर हा रस्ता पाण्याखाली आहे. वाझर बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याने आंधळी रस्ता पाण्याखाली आहे. भाळवणी ते शिरगांव हा रस्ता येरळेच्या पुराने पाण्याखाली आहे. खानापूर ते करंजे व्हाया मुलाणवाडी रस्ता ओढ्याला पूर आल्याने पाण्याखाली गेला आहे. नागेवाडी ओढ्याला पाणी आल्याने कान्हरवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर गोडाचीवाडी ते नागेवाडी रस्ता पाण्याखाली आहे. सांगोले स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तुटलेला आहे. या ठिकाणी ओढ्यावरील बंधारा भरून वाहू लागला आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी आले आहे. याशिवाय विटा ते पारे रस्ता पाण्याखाली आहे.
घानवड ते हिंगणगादे व हिंगणगादे ते मदनेवस्तीकडे जाणारा रस्ता ओढ्याला आलेल्या पुराने पाण्याखाली आला आहे. याशिवाय लेंगरे मादळमुठी रस्त्यावर पुलावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. भांबर्डे येथिल ओढ्यावरील पुलावर दोन फुटहुन अधिक पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशी माहिती तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिली. नागरिकांनी मुसळधार पावसात अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








