खानापूर / वार्ताहर
खानापूर वार्ताहर अग्निशामक विभागाच्यावतीने विविध 15 योजना व त्याचे अनु÷ान करण्यासंदर्भात सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी 14 ते 20 डिसेंबरपर्यंत सकाल सप्ताह कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे जागृती अभियान खानापूर तालुका अग्निशामक दलाच्यावतीने नुकताच हाती घेण्यात आला.
या सकाल सप्ताह कार्यक्रमांतर्गत विविध 15 उपक्रमांची नोंद या सकाल सप्ताह योजनेमध्ये हाती घेतली जाणार आहे. या अभियानांतर्गत बहुमजली इमारत बांधतेवेळी अग्निशामक दलाची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. अशा विविध बाबी या सकाळ योजनेत सक्तीच्या करण्यात आले आहेत. शिवाय अग्निशामक दलाच्यावतीने हाती घेण्यात येणारे बचाव कार्य सुरक्षितता तसेच विविध उपक्रमांची माहिती या सकाल कार्यक्रमांतर्गत नोंद केली जाणार आहे. त्याचा लाभ तालुक्मयातील जनतेने घ्यावा, असे आवाहन खानापूर अग्निशामक दलाच्यावतीने करण्यात आले आहे. सदर सकाल अभियानअंतर्गत कार्यक्रमप्रसंगी खानापूर अग्निशामक दलाचे दल प्रमुख मनोहर राठोडसह जवान उपस्थित होते.









