खानापूर \प्रतिनिधी खानापूर तालुक्यात बुधवारी आणखी सहा जणांना अहवाल पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रूग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे. मंगळवारी मिळालेल्या माहितीनुसार खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकूण पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. बस आगारात मेकॅनिक म्हणून काम करणारा नंदगड येथील 50 वर्षीय रहिवासी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आगारातील काहि भाग सील करण्यात आला असून नंदगड येथील मुख्य रस्ता ग्रामपंचायतीने सील केला आहे. आता नंदगड गावातहि कोरोनाचा शिरकाव झाल्याने धास्ती निर्माण झाली आहे. येथील तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मंगळवारीच दवाखाना सील करण्यात आला आहे.
Previous Articleसांगली : ‘मोक्का’ विशेष न्यायालयाची स्थापना
Next Article भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार ‘ध्रुवास्त्र’