प्रतिनिधी खानापूर
खानापूर तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना यामध्ये गरोदर काहि गरोदर माहिलांचाहि समावेश आहे. शनिवारी तालुक्यातील मेरडा सह्या भागातील तीन गरोदर माfहलाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापैकी मेरडा येथील पॉझिटिव्ह असलेल्या माहिलेला सकाळपासून प्रसूतिवेदना सुरू झाल्याने तिला तातडीने खानापूर येथील शासकीय रुiणालयात दाखल करण्यात आले. येथील तालुका आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नर्स श्वेता गोवेकर, खुर्शीदबानू मुल्ला, तसेच ग्रुप डी च्या मारतमा यांनी विशेष प्रयत्न केले. बाळ बाळंतीण सुखरूप असून या माfहलेला मुलगा झाला आहे. बाळाचे वजन 3.2 किलो आहे येथील नर्सनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या माहिलांची प्रसूती करणे म्हणजे जोखमीचे काम असतानाहि सदर नर्सनी केलेली यशस्वी प्रसूती कौतुकास्पद आहे. तालुका आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवाय त्या माहिलेच्या घरच्यांनीहि केलेल्या सहकार्याबद्दल आरोग्य खात्याने आभार मानले.