वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्यात शनिवारी आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये खानापूर दुर्गानगर मध्ये एक 42 वर्षीय पुरुष, गणेबैल प्राथमिक आरोग्य केंद्रातील 42 वर्षीय एक महिला व हलशी टिपू सुलतान चौकातील एक 24 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 112 वर पोहोचली आहे.









