तालुक्यातील आठही प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा : नागरिकांतून उत्तम प्रतिसाद, तालुका आरोग्य अधिकाऱयांची माहिती

पिराजी कुऱहाडे / खानापूर
आरोग्य खात्याच्यावतीने गेल्या मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. यानुसार खानापूर तालुक्मयात लसीकरणासाठी नागरिकांनी उच्चांकी नोंद केली आहे. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या या लसीकरण मोहिमेला खानापूर तालुक्मयातून चांगला प्रतिसाद मिळाला असून तालुक्मयाने आतापर्यंत तब्बल वीस हजार 56 लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. खानापूर तालुक्मयाच्या लोकसंख्येच्या मानाने हा उच्चांक म्हणावा लागेल.
बेळगाव जिल्हय़ात आरोग्य खात्याच्यावतीने मोफत को-व्हॅक्सीन तसेच कोवीशिल्ड लसीकरणाला सर्वत्र प्रारंभ करण्यात आला आहे. आरोग्य खात्याच्यावतीने मोफत लसीकरण हाती घेण्यात आली असून कोरोना प्रतिबंधक लसीला अनेक भागातून प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिन्याभरात कोरोना महामारीच्या पुनरावृत्तीची धास्ती सर्वसामान्य माणसांत लागली आहे. एक वर्षाचा काळ संपत आला. परंतु देशावरील कोरोनाचे संकट अद्याप दूर झालेले नाही. देशभरातील अनेक राज्यांमध्ये या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्य व केंद्र शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोरोना संदर्भातल्या नियमांचे पालन करत आरोग्य संपदा जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोना प्रंतिबंधक लसीकरणासाठी सर्वसामान्य नागरिक पुढे सरसावले आहेत. त्यामुळे तालुक्मयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता दिवसेंदिवस नागरिकांची वाढती गर्दी दिसून येत आहे. खेडय़ातील नागरिक खासगी वाहने करून येत आहेत. खानापूर तालुक्मयात गेल्या आठ दिवसात दररोज एक हजार ते बाराशे लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्मयातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांच्या सकाळपासून रांगा लागत आहेत. ंतालुक्मयातील नागरिकांनी दिलेला हा प्रतिसाद लक्षात घेता ही उच्चांकी नोंद म्हणावी लागेल. लसीकरणासाठी येणाऱया नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी आरोग्य खात्याच्यावतीने काळजी घेतली जात असून याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
खानापूर तालुक्मयाचा विस्तारित भाग लक्षात घेता ग्रामीण भागातून यासाठी जागृती होणे गरजेचे आहे.
आतापर्यंत अन्य तालुक्मयांच्या तुलनेत वयस्कर लोकांच्या यादीत खानापूर तालुक्मयाचे 23 टक्के उच्चांक साधला आहे. तालुक्मयात प्रारंभीच्या काळात लसीकरणासाठी लोकांना आवाहन करण्यात आले. परंतु गेल्या आठवडय़ाभरात या लसीकरणासाठी गावागावातून लोक सकाळी 10 पासून सायंकाळी 5 पर्यंत तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी येऊन लसीचा लाभ घेत आहेत. .प्रारंभीच्या टप्प्यात तालुक्मयात 60 नागरिकांना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. गुरुवारी सायंकाळपर्यंत 20,056 नागरिकांनी लसीकरण करून घेतले. तालुक्मयातील प्राथमिक आरोग्य पेंद्रांमध्ये या लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला असून प्रत्येक केंद्रातून नागरिकांची या लसीकरणासाठी गर्दी होत आहे. प्रामुख्याने खानापूर तालुका सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये मार्चअखेर पर्यंत जवळपास 3100 हून अधिक जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यापाठोपाठ गणेबैल आरोग्य केंद्रात 1752 तर लोंढा आरोग्य केंद्रात 1789 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. त्याप्रमाणे अशोकनगर आरोग्य केंद्रा अंतर्गत 1324, नंदगड केंद्रात 1477, बिडी केंद्रात 1554, पारिश्वाड केंद्रात 1314, कणकुंबीत 2311, हलशीत 1226, इटगी केंद्रात 1849 तर कक्केरी प्राथमिक आरोग्य केंद्रात 1055 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला असल्याचे सांगितले.
45 वर्षावरील नागरिकांनाही आता लसीकरण

तालुका आरोग्याधिकारी संजय नांदे आतापर्यत आरोग्य खात्याच्या निर्देशनानुसार 60 वर्षावरील नागरिकांना लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता 9 एप्रिलपासून 45 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या वयोगटात 23 टक्के नागरिकांचा समावेश येतो. या लसीकरणासाठी केवळ आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. नागरिकांनी याचा अधिकाधिक फायदा घ्यावा. या लसीकरणामुळे कोणतेही संपत साईड इफेक्ट नाहीत. तसेच आतापर्यंत तशी कोणतीच तक्रार आली नाही.
– संजय नांद्रे, तालुका अधिकारी
लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ

खानापूर तालुक्यात जवळपास पावणे तीन लाख लोकसंख्या आहे. विस्ताराने मोठा असलेल्या तालुक्यातील अनेक लोक लसीकरणासाठी सक्रिय झाले आहेत. तरी यासाठी जागृती आवश्यक आहे. प्रत्येकाला लस पोहचवण्यासाठी तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कसोशिने प्रयत्न करत आहेत. सद्यपरिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची धास्ती निर्माण झाल्याने राज्य सरकारने मार्गसुची जारी केल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन करावे व लसीकरणासाठी अधिकाधिक सहभाग घ्यावा. लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे कोरोनाचा धोका टळू शकतो.
– रेष्मा तालिकोटी, तहसीलदार









