खानापूर
खानापूर तालुक्यातील बिडी येथील 50 वर्षीय कोरोनाबाधिताला उपचारासाठी बेळगावच्या बिम्स रुग्णालयात दाखल केले होते. सदर रुग्ण उपचार सुरू असतानाच दगावला. त्यामुळे खानापूर तालुक्यात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या आठवर पोचली आहे. त्यांना उपचारासाठी चार दिवसांपूर्वी बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल केले होते. पण त्या ठिकाणी त्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला बिम्समध्ये हलविण्यात आले होते.









