नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2019-20 मधील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (केवीआयसी)एकूण व्यवसायाची उलाढाल 88 हजार 887 कोटी रुपयांची झाली आहे. खादीउद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. रोजगार देणाऱया या उद्योगाला विकासाच्या पथावर कायम ठेवण्याचा विश्वास केवीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी व्यक्त केला आहे.
सन 2015-16 मध्ये खादीचे उत्पादन 1,066 कोटींचे झाले होते. 2019-20मध्ये 2,292.44 कोटी रुपये झाले होते. यामध्ये दोन्ही वर्षाच्या कालावधीमधील उत्पादनाचा आकडा पाहिल्यास 115 टक्क्मयांहून अधिकची वाढ नोंदवण्यात आली आहे. याच कालावधीत खादी फॅब्रिकच्या उत्पादनांची विक्री 179 टक्क्मयांनी वधारुन 4,211.26 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. एकंदर कार्य प्रगतीपथावर आहे.









