प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फक्त बँकिंग व्यवसाय न करता वेळोवेळी ग्राहकाभिमुख योजना राबवत असते. या योजनाना ग्राहक खातेदारांचा कायम मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलिमध्ये व्यक्तीना विमा संरक्षण असणे गरजेचे आहे. यासाठी बँकेने ’ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने ’ अंतर्गत पात्र खातेदारांचा वार्षिक प्रिमियम स्वतः भरून त्यांना अपघात विमा कव्हर प्राप्त करून देणेचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व सेव्हीग्ज ठेव खातेदारांनी आपल्या शाखेत योजना फॉर्म भरून देवून विमा संरक्षित व्हावे.असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा.आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
बँकेचे संचालक मा.ना.रामराजे ना.निंबाळकर म्हणाले केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनांचा विचार केला तर आजपर्यंत योजनेत सहभागी झालेल्या खातेदारांची संख्या फार कमी आहे. सध्याच्या धकाधकीची जीवनशैली पहाता प्रत्येक व्यक्तीला विमा संरक्षण असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपली जिल्हा बँक या योजनांचा ग्राहक , खातेदार यांना फायदा व्हावा यासाठी सदैव प्रयत्नशील असते, या दृष्टीने बँकेने ओरीएन्टल जनरल इन्शुरन्स कंपनी च्या वतीने सुरू असलेल्या ” प्रधानमंत्री सुरक्षा अपघात विमा योजना” (झ्श्एँभ्) या फक्त अपघात कव्हर असणाया योजनेमध्ये सहभागी होणाया सर्व खातेदारांना त्यांनी अदा केलेला वार्षिक प्रिमियम परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे आता जिल्हा बँकेच्या खातेदाराला रू. 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण प्राप्त होणार आहे.
बँकेचे संचालक मा.ना. बाळासाहेब पाटील म्हणाले सातारा जिल्हा बँकेने ग्राहक हिताला सदैव प्राधान्य दिले आहे यामुळे बँकेने खातेदारांच्या भविष्याचा वेध घेत उचललेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे . या अपघात विमा योजनेचा प्रिमियम बँकेने परतावा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिह्यातील बँकेच्या सुमारे 10 लाख पेक्षा जास्त खातेदारांना या योजनेंतर्गत अपघात विमा संरक्षण प्राप्त होणार आहे. आणि दुर्दैवाने खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्यांच्या वारसाला 2 लाख रुपये आर्थिक मदत होणार आहे. वरील योजने अंतर्गत विमा संरक्षण प्राप्त होण्यासाठी खातेदारास बँकेत जाऊन योजना फॉर्म भरून देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे जे खातेदार आजवर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी झाले नाहीत त्यांनी आजच आपल्या सातारा जिल्हा बँकेच्या शाखेत जावून योजना फॉर्म भरून द्यावा .तसेच या योजनांव्यतिरिक्त प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना , पगारदार खातेदार अपघात विमा योजना या बँकेच्या वतीने सुरु असलेल्या इतर विमा योजनांमध्ये नियमानुसार पात्र खातेदारांनी समाविष्ट होवून आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करावे असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली . याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष श्री सुनिल माने, मा.आ.शशिकांत शिंदे ,मा.आ.मकरंद पाटील ,माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर , सर्व संचालक , सरव्यवस्थापक , श्री .राजीव गाढवे , श्री राजेंद्र भिलारे . बिगरशेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक श्री.वाय.जे.साळुंखे , उपव्यवस्थापक श्री.महेश शिंदे , बँकेचे अधिकारी व सेवक उपस्थित होते








