हॉटेल समुद्र, हॉटेल बगीचा, ऑर्चर्ड, गॅरेज कॅफे ग्राहकांच्या सेवेत पुन्हा रुजू
हॉटेल समुद्र, हॉटेल बगीचा, ऑर्चर्ड (रिसॉर्ट) व गॅरेज कॅफे पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू होताच प्रशासनाने हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला. पण आता अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात 8 जूनपासून हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, कॅफे यांना नियमावलीचे पालन करत मुभा देण्यात आल्यामुळे खवय्यांना आता चमचमीत पदार्थ चाखता येणार आहेत.
कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून हॉटेल बगिचा, हॉटेल समुद्र, ऑर्चर्ड व गॅरेज कॅफेमध्ये सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक ग्राहकाला प्रवेशद्वारावर हातावर सॅनिटायझर देऊन त्याची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करून नावनोंदणी करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात ही व्यक्ती कोणकोणत्या ठिकाणी गेली आहे, याचा संपूर्ण तपशील घेण्यात येत आहे.
रिसेप्शनवरदेखील ग्राहकांची सर्व ती माहिती घेऊन ग्राहक कुठून आला आहे, त्याला कोणत्या प्रकारचा आजार आहे का? यासंबंधीची सर्व खात्री करून घेतली जात असून कोणताही स्पर्श न होता त्याच्याकडून सर्व डॉक्मयुमेंट्स घेतले जात आहेत. हॉटेलचाच भाग असलेल्या लॉजमध्ये एखादा ग्राहक राहणार असेल तर त्याची संपूर्ण खोली सॅनिटाईज्ड करूनच त्याला प्रवेश दिला जात आहे.
खवय्यांसाठी विशेष सुरक्षा
समुद्र हॉटेलमध्ये येणाऱया प्रत्येक खवय्यांना हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग करूनच आत प्रवेश दिला जात आहे. याशिवाय जेवणाच्या टेबलाची व्यवस्था देखील सामाजिक अंतर ठेवूनच करण्यात आलेली आहे. हाताचा स्पर्श न होता खवय्यांना इतर सामग्रीच्या साहाय्याने सेवा पुरविली जात आहे. एखादा ग्राहक जेवून तृप्त होऊन गेल्यावर संपूर्ण टेबल-खुर्च्या पूर्णपणे सॅनिटाईज्ड करूनच दुसऱया व्यक्तीला बसण्यास देण्यात येत आहे.
कर्मचाऱयांचीही घेण्यात येत आहे काळजी
या चारही हॉटेलमध्ये सेवा करणाऱया मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, वेटर, कूक (स्वयंपाकी), सफाई कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱयांना पूर्णपणे सॅनिटाईज्ड करून थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करून रोज शरीराचे तापमान नोंदविण्यात येत आहे. याशिवाय कर्मचाऱयांना हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. कर्मचाऱयांसाठी मास्क, ग्लोव्ज, सेफ्टीशिल्डही देण्यात आले आहे. एकंदरीत पाहता हॉटेल समुद्र, बगिचा व ऑर्चर्ड यांनी आपल्या ग्राहकांबरोबरच कर्मचाऱयांचीही विशेष सुरक्षेची जबाबदारी घेतल्याचे पहायला मिळत आहे.
ग्राहकांचीही विशेष काळजी
अजय कुमार सिन्हा , समुद्र हॉटेलचे व्यवस्थापक
सरकारच्या नियमांचे पालन आम्ही करत आहोत. हॉटेलच्या विशेष सेवेचा म्हणजेच लॉजचा लाभ ग्राहक घेणार असेल तर त्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यासाठी डॉक्टरांकडून मान्यताप्राप्त सर्टिफिकेट पाहूनच त्यांना हॉटेलच्या लॉजमध्ये राहण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्राहकाने आपल्या सोबत आणलेली बॅग पूर्णपणे सॅनिटाईज्ड केली जात आहे. याबरोबरच खवय्यांसाठीही विशेष काळजी घेण्यात आलेली आहे.









