उन्हाळ्यात खूप घाम येतो. घामाच्या दुर्गधीमुळे आपण खूपच हैराण होतो. इतरांनाही याचा त्रास होतो. ही दुर्गंधी घालवण्यासाठी डिओडरंट वापरला जातो. तुम्हीही डिओ विकत घेण्याच्या विचारात असाल तर या टिप्स फॉलो करा.
- बर्याच जणी फक्त सुगंध घेऊन डिओची निवड करतात. मात्र ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. डिओतले घटक जाणून घेणं खूप आवश्यक आहे. काही डिओंमध्ये अत्यंत घातक रसायनं असू शकतात. या रसायनांमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. नवा डिओ विकत घेतल्यावर छोटी चाचणी करून बघा. अंगावर पुरळ उठत असेल किंवा त्वचा लाल होत असेल तर तो डिओ वापरू नका.
- शक्यतो अल्कोहोलमुक्त डिओचा वापर करा. बर्याच डिओंमध्ये ऍल्युमिनियम हा घटक असतो. तो त्वचेसाठी घातक ठरू शकतो. अल्कोहोलयुक्त डिओमुळे त्वचा कोरडी पडू शकते.
- तुम्हाला डिओची खरंच गरज आहे का हे आधी जाणून घ्या. तुम्हाला खूप घाम येत असेल तर डिओचा काहीच लाभ होणार नाही. घामाचा दुर्गध येत राहील. अशा परिस्थितीत तुम्हाला अँटीपरस्पिरंटची आवश्यकता आहे. मात्र कमी घाम येत असेल किंवा उन्हात फार बाहेर पडत नसाल तर डिओ खरेदी करायला हरकत नाही. स्वस्तातल्या डिओऐवजी चांगल्या ब्रँडचा डिओ खरेदी करा.









