दिल्लीतील हेड कॉन्स्टेबलच्या शौर्यावर वेबसीरिज
राणी मुखर्जीचा चित्रपट ‘मर्दानी’ अनेक लोकांनी पाहिला असेल. पण दिल्ली पोलीस विभागातील खरी मर्दानी सीमा ढाका हिच्या शौर्याची कथा आता वेबसीरिजच्या स्वरुपात पहायला मिळणार आहे. 76 बेपत्ता आणि तस्करीचे बळी ठरलेल्या मुलांना शोधून त्यांच्या कुटुंबाशी भेट घडवून आणणाऱया सीमाला आउट ऑफ टर्न प्रमोश देत हेड कॉन्स्टेबलवरून सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) करण्यात आले आहे. दिल्ली समयपूर बादली पोलीस स्थानकात तैनात सीमा अशी पदोन्नती मिळविणारी पहिली पोलीस कर्मचारी ठरली आहे.
सीमाचे जीवन प्रेरक आहे, तिच्या पेरक जीवनावर चित्रपट निर्माण व्हायला हवा असे अमिताभ बच्चन यांनीच म्हटले होते. या सुपर कॉप सीमा ढाका यांच्या जीवनावर आता लवकरच बायोपिक तयार होणार आहे. एब्सोल्युट बिन्ज एंटरटेनमेंटने वेब सीरिजसाठी हक्क घेतले आहे. एक वर्षात 50 मुलांच्या शोधण्याचे अवघड लक्ष्य तिने 75 दिवसांत 76 मुलांना शोधून पूर्ण केले आहे.