बऱ्याच गृहिणींना रोज स्वयंपाकाला काय बनवायचं हा प्रश्न पडत असतो.किंवा कधी कधी स्वयंपाक करायचा कंटाळा देखील येतो. अशावेळी बाहेरच्या खाण्याला पसंती दिली जाते.पण बाहेरच फास्टफूड किंवा मसालेदार जेवण जेवल्याने त्रास होऊ शकतो. आपल्याला नेहेमीच हलके आणि सकस अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.म्हणूनच आज आपण झटपट , स्वादिष्ट आणि पोटभर डाळ खिचडी कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत. शिवाय ही खिचडी पौष्टिक देखील असते.कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी डाळ खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे.
साहित्य
१ वाटी तांदूळ
पाव वाटी तुरीची डाळ
तूप किंवा तेल
हळद
मोहरी
जिरे
हिंग
अर्धा चमचा धने पावडर
एक चमचा लाल तिखट
१ चमचा आले लसूण पेस्ट
एक बारीक चिरलेला कांदा
एक बारीक चिरलेला टोमॅटॊ
कढीपत्ता
कोथिंबीर
मीठ
पाणी
कृती
सर्वप्रथम तांदूळ आणि डाळ दोनवेळा पाण्याने धुवून घ्या. यांनतर त्यामध्ये ३ वाट्या पाणी, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद घाला. आणि मंद आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या.यांनतर शिजलेला डाळभात पळीने घोटून एकजीव करून घ्या.भात जर मोकळा वाटत असेल तर त्यामध्ये थोडसं पाणी घालून मॅशरने घोटून घ्या. यांनतर कढईमधे ३ चमचे तेल किंवा तूप घालून गरम करा. त्यात मोहरी तड्तडवून घेऊन जिरे घाला.आता त्यात बारीक चिरलेला कांदा भाजून घ्यावा. यानंतर त्यात बारीक टोमॅटो ,आले लसूण पेस्ट,लाल तिखट,धने पूड हे सर्व जिन्नस घाला आणि ४ ते ५ मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या.यानंतर त्यामध्ये घोटलेला डाळ भात घाला.आणि सर्व मिक्स करून घ्या आणि मंद आचेवर ३ ते ४ मिनटे शिजवून घ्या.यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला म्हणजे चविष्ट आणि पौष्टिक खिचडी तयार. जर तुम्हाला ही खिचडी आणखी खमंग बनवायची असेल तर वरून तुपाची फोडणीही तुम्ही देऊ शकता. यासाठी एका छोट्या कढईमधे २ चमचे तूप घ्या त्यामध्ये एक चमचा जिरे मोहरी,पाव चमचा हिंग आणि ५ ते ६ कडिपत्त्याची पाने घाला.आणि डाळ खिचडीवर या फोडणीचा तडका द्या. तयार झालेली गरमागरम खमंग डाळ खिचडी साजूक तूप,लोणचे आणि पापडासोबत सर्व्ह करा.
Previous Articleनोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला स्थगिती
Next Article भारत जोडो ऐवजी काँग्रेस जोडो यात्रा करा, शायना एनसी









