कृषी विभागाच्या कारभारावर भाजपा नाराज, जिल्हा कृषी अधिक्षकांसमोर वाचला तक्रारींचा पाढा
प्रतिनिधी / मिरज
तालुका कृषी विभागात गेल्या अनेक दिवसांपासून अनोगोंदी कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात नाही. बोगस कागदपत्रे जोडून खते आणि बियाणे हडप केली जात आहेत, असा आरोप मिरज तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याबाबत जिल्हा कृषी विभागाचे अधिक्षक बसवराज मास्तोळी यांना निवेदन देऊन खते, बियाणे हडप करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.








