मिशन चौक ते सिव्हिल चौकापर्यंतचे खड्डे मुजविले, आंदोलनापेक्षा श्रमदानाला प्राधान्य
प्रतिनिधी / मिरज
सध्या मिरज शहर आणि परिसरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. ऐन कोरोनाच्या संकटात स्थानिक प्रशासनावर कामाचा ताण असल्याने निवेदने देऊन आंदोलने करण्यापेक्षा आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाला प्राधान्य दिले. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी स्वतःच खोरे आणि पाटी घेऊन कामाला सुरुवात केली.
शहरातील मिशन हॉस्पिटल चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौकपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे मुजविले. रस्ते खड्डेमय झाले म्हणून खड्ड्यात बसून आंदोलन करण्यापेक्षा नागरिकांनी श्रमदानातून मिरज शहर खड्डेमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी केले.








