नाशिक \ ऑनलाईन टीम
भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली असून भोसरीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्यांची देखील चौकशी सुरू आहे. या प्रकरणाबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी ‘मी ईडीचा प्रवक्ता नाही’, अशा शब्दांत भाजपवर ईडीवरुन आरोप करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणले की, यासंदर्भात ईडी काय बोलायचं ते बोलेल, मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशाप्रकारे सूडाचं राजकारण केलं जात नाही. तसेच केंद्रीय मंत्रीपदापासून पंकजा मुंडे यांना दूर ठेवल्याबाबतही त्यांनी मौन पाळण्याचा सल्ला दिला. मंत्रीपदाच्या वाटपाबाबत सर्व समाधानी आहेत, उगाच भांडणं लावू नयेत, असंही फडणवीस म्हणाले.
नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारामुळे युतीच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला का? या प्रश्नावर फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. एक तर चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात. चर्चा वेगवेगळ्या प्रकारे होतात. राणेंना त्यांच्या क्षमतेवर मंत्रिमंडळात घेतलं आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपवर थेट आरोप केला होता. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








