साहित्य : अर्धी वाटी चणाडाळ, 1 वाटी तांदूळ, दीड चमचा हिरवी मिरची-आलं-लसूण पेस्ट, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी, पाव चमचा खाण्याचा सोडा, पाव चमचा हळदपूड, 1 चमचा तेल, चवीपुरते मीठ, फोडणीसाठीः 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा तीळ, 4 ते 5 कढीपत्ता पाने, 2 चमचे कोथिंबीर चिरुन
कृती : चणाडाळ आणि तांदूळ रात्रभर अथवा आठ तास भिजत घालावेत. दुसरे दिवशी निथळून त्यात दही आणि पाणी घालून मिक्सरला लावून इडलीच्या पीठाप्रमाणे बॅटर बनवावे. तयार बॅटर बाऊलमध्ये काढून त्यात मीठ आणि हळदपूड मिक्स करून सहा ते आठ तास उष्ण ठिकाणी ठेवावे. नंतर त्यात हिरवी मिरची-आलं-लसूण पेस्ट मिक्स करावी. नंतर बेकिंग सोडा मिक्स करावा. स्टिमर प्लेटला तेलाचा हात लावून तयार बॅटर त्यात ओतून एकसारखे करावे. वरून जिरं आणि लाल तिखट पावडर भुरभुरून बॅटर 10 ते 15 मिनिटे वाफवावे. गार करून चौकोनी तुकडे करावेत. फोडणीचे साहित्य गरम तेलात फोडणी करून तयार ढोकळय़ावर ओतून त्याचे चौकोनी तुकडे करून कोथिंबीरने सजवून खाण्यास द्या.









