प्रतिनिधी / मायणी :
खटाव तालुक्याची जीवनदायी असणारी येरळा नदी भर पावसाळ्यात कोरडी ठाक असल्याने खटाव तालुक्यात निसर्गाचा लहरीपणा दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात वरुणराजाने रौद्ररूप धारण केल्याने कृष्णा कोयनेसह अनेक नद्या खवळल्या आहेत. महापूराने अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. अनेकांचे संसार रस्त्यावर आले. अशा गोष्टींची पुनरावृत्ती नको असे सर्वांनाच वाटते. परंतु निसर्गाचा चमत्कार वेगळाच आहे, खटाव तालुक्याची जीवनदायी असणारी येरळा नदी आज अखेर कोरडी पडल्याने निसर्गाचा लहरीपणा जाणवतो.









