वसगडे / वार्ताहर
पलूस तालुक्यातील खटाव येथील गावठाण बाह्य हद्द निश्चित करणार असुन पलूस येथील भूमी अभिलेख कार्यालया कडून २० नोव्हेंबर रोजी हद्द निश्चित करण्यात येणार आहे. तरी याबाबत गावालगत असणार्या ३० च्या वर खातेदारांनी हजर राहण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतिने करण्यात आले आहे. उपस्थित न राहिल्यास शासन नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी हद्द दाखविण्यात येईल ती मान्य करावी लागेल याची नोंद घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन सरंपच लिलावती गुरुव यांनी केले आहे.
याठिकाणी हद्दीच्या खुणा करणेसाठीच्या योग्य त्या तरतुदी करण्यात आल्या असुन संबधितानी ७/१२ उतारे व नकाशे घेऊन उपस्थित राहावे अशी माहीती उपसरपंच श्रीकृष्ण पाटील यांनी दिली आहे.
फेब्रुवारी २०१९ रोजी च्या शासन निर्णय तसेच ग्रामपंचायत खटाव यांच्या मागणी नुसार जीआयएस आधारीत सर्व्हेशन व भुमापन करुन हद्द निश्चती करण्यात येणार आहे. भविष्यात ड्रोनचा वापर करुन गावठाण मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी भूमि अभिलेक कार्यालयाचे भूकर मापक, परीरक्षण उपस्थित राहणार आहेत. यादिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यांची योग्य ती दक्षता घेणार असल्याचे ग्रामसेवक आर.एन.घाटगे यांनी सांगितले.
Previous Articleप्रेम प्रकरणावरुन तरुणाच्या घरावर हल्ला
Next Article कोल्हापूर : दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या








