वसगडे / वार्ताहर
खटाव ता.पलूस येथील येरळा नदिकडे जाणार्या रस्त्याचा मुरुमाचा भराव वाहुन गेल्याने डांबरी रस्ता खचुन काही भाग तुटुन गेल्याने धोकादायक बनला आहे. त्यामुळे साधारणतः बाराफुटी रस्ता सहाच फुटी राहिला आहे.
सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात कृष्णाकाठावर ढग फुटी सद्रश्य पाऊस झाल्याने परीसरातील ओढे नाले तुडुंब भरुन वाहिले त्या दरम्यान अति पाण्याच्या प्रवाहाने हा रस्ता खचला. एक महिन्यापासून रस्ता खचला असताना दगडावर चुना मारण्या व्यतिरिक्त पलूस सार्वजनिक बांधकाम खाते किंवा खटाव ग्रामपंचायतीने काही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. चुना मारलेले दगड सुध्दा गायब झाले आहेत.
Previous Articleबोरवडेत आठ वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्याला ग्रामस्थांकडून चोप
Next Article रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब कोरोना पॉझिटिव्ह








