प्रतिनिधी / खंडाळा :
खंडाळा तालुक्यातील सात गावेे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली असल्याची माहिती तालुका पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी दिली.
खंडाळा तालुक्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. घाडगेवाडी, कर्नवडी, लिंबाचीवाडी, झगलवाडी, सुखेड, कराडवाडी, पारगांव ही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर 2020-21 मध्ये हरतळी, राजेवाडीत नळ पाणी पुरवठा विशेष दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. दरम्यान, सुखेड येथील दोन वस्त्या, पारगांव, कर्नवडी येथे विहीर अधिग्रहण करणे प्रस्तावित असून घाडगेवाडी (ता. खंडाळा ) गावाला टँकर सुरू करण्याची मागणी असल्याचे सांगण्यात आले.









