मार्केट पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी \ बेळगाव
खंजर गल्ली येथे मटका घेणाऱया एका बुकीला अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी बुधवारी दुपारी ही कारवाई केली असून यासंबंधी कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
इजारअहमद महम्मदइसाक नेसरीकर असे त्याचे नाव असून त्याच्या जवळून 600 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी ही कारवाई केली आहे. इजारअहमदने मोहम्मदशफी ताशिलदार याला चिठ्ठय़ा पोहोचवत असल्याची कबुली दिली असून त्याच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









