प्रतिनिधी/ बेळगाव
घरातील लोक रागावल्याच्या किरकोळ कारणातून केदनूर येथील एका तरुणाने जनावरांच्या गोठय़ात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. सचिन शट्टू लोहार (वय 22) असे त्या तरुणाचे नाव आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये किरकोळ कारणातून आत्महत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. तरुण असो किंवा तरुणी टोकाची भूमिका घेत आहेत. सचिन याने रात्री घरातील लोक रागावल्यानंतर घरातून बाहेर पडून जनावरांच्या गोठय़ामध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघडकीस आली.
या घटनेनंतर तातडीने काकती पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प यांनी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठविण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









