सांखळी /प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात विविध सामाजिक, आरोग्य या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून आज गुरुवारी सांखळी भारतीय जनता पक्ष आयोजित सांखळी सामाजिक आरोग्य केंद्रात मतदारसंघातिल नागरिकांसाठी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बुस्टर डोस देण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच क्षयरोग झालेल्या रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी या कार्यक्रमातखास जागृती करण्यात आली.
यावेळी आरोग्य अधिकारी अतुल पै, विश्वनाथ पै, न्हावेलीचे सरपंच कालिदास गावस, नगरसेवक दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, शुभदा सावईकर, पंच सुभाष फोंडेकर, गुरुप्रसाद नाईक, कार्यक्रम अधिकारी स्वाती मायणिकर यांची उपस्थिती होती.
रुग्ण सेवा नेहमीच दोघांच्याही मनाला समाधान देऊन जाते :मुख्यमंत्री
सेवा पख्वाडा अंतर्गत राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात टीबी रुग्णांची उत्तम सेवा व उपचार करण्यासाठी दत्तक योजना फलदायी ठरणार असुन रुगांसाठी दर महा आर्थिक मदत देऊन त्यांना उत्तम दर्जाचा आहार व उपचार तसेच शंभरकटक्के ठीकठाक करण्याची योजना असुन त्याला सर्वानी सहकार्य करून रुग्णा ना दिलासा द्यावा कारण रुग्ण सेवा ही देणाऱया आणि घेणाऱयांच्या मनाला समाधान देऊन जाते .आपली छोटीशी मदत कोणाच्या तरी जीवनात आनंद निर्माण करणारआहे तेव्हा सहकार्य द्या. आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांखळी सामाजिक आरोग्या केंद्रात कार्यक्रमात बोलताना केले. तसेच सर्व सांखळी मतदारसंघातिल नागरिकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
क्षय रोग्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सांखळीतुन अनेकांचा पुढाकार
जास्त करून अंगात कमी शक्ती असलेला माणूस क्षय झालेल्या माणसाच्या संपर्कात आल्यास आणि त्यास योग्य आहार न मिळाल्यास रोग बळावतो म्हणून अशा रोग्यांना चांगला पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी शक्मय असल्यास आर्थिक मदत द्यावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच सांखळी मतदारसंघात अनेकांनी आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला असून अधिक माहितीसाठी आरोग्य अधिकारी अतुल पै यांच्याशी संपर्क साधावा असे या कार्यक्रम आयोजकांनी सांगितले.
सांखळी मतदारसंघातपन्नास क्षय रोगी
सांखळी शहर तसेच ग्रामीण भागात आज पन्नासच्या वर क्षय रोगी असुन अश्या रोग्यांना सामाजिक दिलासा आणि आर्थिक मदत आवशयक असल्याने शक्मय असल्यास अशांना सहकार्य करा जाणे करून ते या रोगातून मुक्त होईल, आरोग्य अधिकारी आणि सरकार सहकार्य करतच आहे आपलंही सहकार्य लाभल्यास त्यांना आपल्यासाठी कोणातरी काम करत असल्याचे समाधान मिळले.या साठी महिना काही प्रमाणात शुल्क रोख रक्कम सांखळी आरोग्य केंद्रात जमा करावी असे मत सामाजिक कार्यकर्तया नी व्यक्त केले.