ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संसर्गित रुग्णांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त असलेला विशेष तंबू कानपूरयेथील ऑर्डिनन्स इक्विपमेंट फॅक्टरीतील तज्ज्ञांनी तयार केला आहे.
अंदाजे 9.55 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचा हा तंबू वॉटरप्रूफ फॅब्रिक, स्टील आणि ॲल्युमिनियमपासून बनविण्यात आला आहे. या तंबूत 2 खाटा बसतात. कमी जागेत हा तंबू कुठेही उभारता येतो आणि तातडीने रुग्णांवर उपचार करता येतात.अशा प्रकारचे 50 तंबू ऑर्डिनन्स इक्विपमेंट फॅक्टरी बोर्डाने अरुणाचल प्रदेशात ट्रायलसाठी पाठविले आहेत.









