वार्ताहर / मालवण:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांना प्राथमिक शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. ओझर विद्यामंदिर, कांदळगाव येथे क्वारंटाईन करण्यात आलेले चाकरमान्यांनी स्वस्थ बसून न राहता शाळेचा परिसर स्वच्छ केला आहे. या चाकरमान्यांनी शाळेविषयी असणारी कृतज्ञता आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. चाकरमान्यांनी शाळेचा सर्व परिसर श्रमदानाने स्वच्छ केला आहे. शाळेच्या बाजूला असणाऱया झाडांसाठी खळी केली आहेत. त्यामुळे सध्या झाडांना योग्य पद्धतीने पाणी मिळत आहे. चाकरमान्यांनी शाळा स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. कांदळगाव येथील चाकरमान्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.









