वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स
येथे खेळविल्या जाणाऱया बीएनपी पेरिबस इंडियनवेल्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला टेनिसपटू किम क्लिस्टर्स तसेच ब्रिटनचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू अँडी मरे यांना स्पर्धा आयोजकांनी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे.
तब्बल सात वर्षांनंतर किम क्लिस्टर्सने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रामध्ये पुनरागमन केले आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनच्या अँडी मरेला स्पर्धा आयोजकांनी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन वेल्समध्ये खेळविली जाणारी ही स्पर्धा हार्डकोर्टवरील राहील. या स्पर्धेमध्ये जोकोविच, बार्टी, नदाल, फेडरर, सेरेना विल्यम्स आणि जपानची नाओमी ओसाका यांचा सहभाग राहणार नाही. गेल्या वषी कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. आता यावषी सदर स्पर्धा 4 ते 17 ऑक्टोबर दरम्यान खेळविली जाणार आहे.









